जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
नागरिकांना 600 रुपये प्रति ब्रास दराने साडेतीन हजार ब्रास साठा उपलब्ध आहे, राज्यातील सामान्य नागरिकांना स्वस्त दराने रेती उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ व हिवरखेड पुर्णा घाटासाठी टाकरखेड वायाळ येथे तर राहेरी खुर्दसाठी राहेरी खुर्द येथे डेपो कार्यान्वीत करण्यात आला आहे.
त्यामुळे टाकरखेड वायाळ व राहेरी बु. डेपोमधून 3 हजार 670 ब्रास रेती सामान्य जनतेसाठी शासनाच्या धोरणाप्रमाणे 600 रुपये प्रति ब्रास या दराने उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने सेतू सुविधा केंद्र किंवा ई महासेवा केंद्रातून महाखनिज प्रणालीवर वाळूची ऑनलाईन मागणी नोंदवून शासनाच्या या धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा