राष्ट्रीय मतदार दिन साजरा
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली , दि. 25 : दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येतो. 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवतरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून आज 25 जानेवारी रोजी सर्व मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली जाते.
येथील जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी उपसंपादक चंद्रकांत कारभारी, वरिष्ठ लिपिक श्रीमती आशा बंडगर, सर्वसाधारण सहायक कैलास लांडगे, शिपाई परमेश्वर सुडे आदी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा






