वंदना पोटे मीडिया फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष पोटे जातेगावच्या रहिवासी
शिवशाही वृत्तसेवा , जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर , पारनेर
भारतीय मीडिया फाउंडेशनच्या महिला सेलच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मूळ जातेगाव ता. पारनेर येथील रहिवासी व कारेगाव पुणे येथील उद्योजिका वंदना पोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय मीडिया फाउंडेशन च्या वतीने 2024-25 या वर्षासाठी रणनीती निश्चित करण्यात येऊन सक्रिय सदस्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे. केंद्रीय मॅनेजमेंट अफेअर्स कमिटी तसेच राष्ट्रीय कोर कमिटीच्या मार्गदर्शनानुसार मीडिया फाउंडेशनचे अध्यक्ष संजय कुमार मौर्य, राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद आसिफ अन्सारी यांनी संघटनेस सशक्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. फाउंडेशनचे संस्थापक सदस्य तथा राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद आसिफ अन्सारी यांनी सांगितले की, वंदना पोटे यांनी फाउंडेशनच्या महिला सेलच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करताना संघटनेचे एक नवे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. मिशन 2015 - 25 च्या रणनीतीनुसार वंदना पोटे यांच्यावर महिला सेलच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात येत आहे.
संपूर्ण देशभरात जिल्हा कार्यकारीणी तसेच प्रदेश कार्यकारिणीच्या नियुक्तीची जबाबदारी देत पोटे यांना महिला सेलच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे. भारतीय मीडिया फाउंडेशन केंद्रीय मॅनेजमेंट कमिटी तसेच राष्ट्रीय कोअर कमिटीच्या वतीने प्रदेश कार्यकारणी तसेच जिल्हा कार्यकारणी स्थापन करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या असून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत पोटे यांना सुचित करण्यात आले आहे. पोटे यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल जातेगाव परिसरातून तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत..
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा