वारंवार निवेदन देऊन सुद्धा महामंडळाचे अधिकाऱ्याचे दुर्लक्ष...
सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधीं आरिफ शेख शिवशाही न्यूज
चिखली ते बीबी मार्गे वाघाळा जाणारी बस गेल्या एक महिन्यापासून बंद असल्यामुळे विद्यार्थ्यासह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत .सावखेड नागरे येथे श्रीमती प्रभावती काकू शिंगणे विद्यालयात हिवरा गडलिंग वाघाळा व इतर गावाच्या विद्यार्थी विद्यार्थिनी या शाळेत शिकतात. एक महिन्यापूर्वी चिखली ते बीबी ही बस सेवा चालू होती त्यामुळे प्रत्येकाकडे पासेस आहेत परंतु एक महिना पासून ही बस सेवा अचानक बंद केल्यामुळे या शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ऐन थंडीच्या दिवसांमध्ये वाघाळा पासून सावखेड पर्यंत दररोज लहान विद्यार्थी सह अनेक विद्यार्थ्यांना सावखेड नागरे पर्यंत दररोज पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच पायपीट करत असताना एखादा अनुचित प्रकारही घडू शकतो त्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार चिखली आगार प्रमुखाला निवेदन देण्यात आली परंतु या नियोजन शून्य कारभारामुळे या गोष्टीकडे अधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करत असून नागरिकासह विद्यार्थी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. त्याकरिता ही बस सेवा पुन्हा पूर्ववत करावी अशी मागणी शाळेचे मुख्याध्यापक श्री अनंत कुमार खरात सह विद्यार्थी व गावकऱ्यांनी केली आहे. दखल न घेतल्यास विद्यार्थ्यासह गावकरी उपोषण करणार ..
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा