maharashtra day, workers day, shivshahi news,

मागण्या मान्य करून व्हॉईस ऑफ मीडियाच्या पाठीशी राहू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

व्हॉईस ऑफ मीडियाच्या लढ्याला मोठे यश, साखळी उपोषण ठरले पत्रकारांसाठी नवसंजीवनी

Voice of Media , Chief Minister Eknath Shinde , nanded , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांच्या पुढे आलेल्या मागण्यांबाबत मी समिती नेमत आपल्या मागण्या तातडीने मार्गी लावतो. आम्ही पत्रकारांच्या पाठीमागे खंबीरपणे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या मागण्यांवर आयोजित केलेल्या  बैठकीत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पदाधिकाऱ्यांना  सांगितले.  पंधरा मागण्यांमधील सहा मागण्या येत्या जानेवारीअखेर पूर्ण करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री यांच्या निर्णयाने राज्यातील पत्रकारांना नवसंजीवनी मिळाली आहे. 

नागपूरमध्ये राज्यातील पत्रकारांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया'ने साखळी उपोषण केले होते. या उपोषणात  राज्याच्या कानाकोपऱ्यातून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पदाधिकारी सहभागी झाले होते. या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री यांनी बैठक घेतली होती.

ज्या सहा मागण्यांना मुख्यमंत्री यांनी प्राध्यान्य दिले, त्यात पत्रकारांचे सेवानिवृत्ती वेतन अकरा हजारांवरून एकवीस हजार, सोशल मीडियाचे प्रश्न, जाहिरात वाटपाचे विषय, आदी विषयांचा यात समावेश होता. या संदर्भात तातडीने शासकीय अध्यादेश काढू, शासकीय समन्वयाअभावी कुणालाही त्रास होणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्री शंभूराजे देसाई,  आमदार संजय गायकवाड यांच्याकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीचे कामकाज सुपूर्द केले. पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात माहिती महासंचालक ब्रिजेशकुमार यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून,  शासकीय मागण्या आम्ही तातडीने मंजूर करू, असे मंत्री शंभूराजे देसाई यांनी  सांगितले. या बैठकीत  अनिल म्हस्के प्रदेशाध्यक्ष  ‘व्हॉईस ऑफ मीडिया’,  दिव्या भोसले राष्ट्रीय महासचिव, मंगेश खाटिक विदर्भ अध्यक्ष, आनंद आंबेकर राज्य उपाध्यक्ष, जितेंद्र चोरडिया शहर कार्याध्यक्ष चंद्रपूर, किशोर कारंजेकर, जिल्हा अध्यक्ष वर्धा, राजेश सोनटक्के विदर्भ संघटक, सचिन धानकुटे तालुका अध्यक्ष सेलू,नरेंद्र देशमुख विदर्भ उपाध्यक्ष, एकनाथ चौधरी जिल्हा सचिव वर्धा, कृष्णा सपकाळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बुलढाणा यांची उपस्थिती होती. 
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !