तृतीय पथियांची आरोग्य तपासणी आज सामाजिक कार्यालय येथे तपासणी करण्यात आली
शिवशाही वृत्तसेवा , जिल्हा प्रतिनिधी हिंगोली चंद्रकांत वैद्य
हिंगोली : 22डिसेंबर ( गुरुवार) रोजी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग लक्ष्मीबाई मागासवर्गीय महिला मंडळ बहादरपुरा जिल्हा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या सभागृहात तृतीयपंथीयांचे आरोग्य तपासणी शिबिर मार्गदर्शन कार्यशाळा व ओळखपत्र नाव नोंदणी कार्यक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर ज्ञानेश्वर चौधरी डॉक्टर शिवाजी विसळकर, माननीय राजू जी एडके सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली संस्थेचे अध्यक्ष संजय कावळे तृतीयपंथीयाचे प्रतिनिधी वैशाली अर्चना बकस पार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे संस्थेचे प्रतिनिधी कपिल वाघमारे सहाय्यक लेखा अधिकारी श्री श्रीकांत कोरडे इत्यादीची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माननीय राजीव एडके यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत अशोक इंगोले यांनी केले यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर साहेब यांनी यांनी तृतीयपंथीयांच्या समस्या त्यांना मिळणाऱ्या शासनाच्या योजना व विविध लाभ नाव नोंदणी याविषयी सखोल मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शनात बोलताना जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी शासनाकडून मिळणाऱ्या योजनेचा फायदा घ्यावा असे आव्हान केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सखाराम चव्हाण यांनी केले सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय विभाग विविध कर्मचारी जिल्हा जात पडताळणी समिती कर्मचारी विविध महामंडळाचे कर्मचारी
उपस्थिती होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा