स्वामी वैष्णवानंद पुण्यतिथी साजरी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
मांजरम येथील स्वामी वैष्णवानंद संस्थानात दरवर्षीप्रमाणे स्वामी वैष्णवानंद यांच्या पुण्यतिथीनिमित् ९ डिसेंबर ते ११डिसेंबर, या त्रिदिन उस्तवात सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आसून या कार्यक्रमात ख्यातकीर्त महंत,नामवंत कीर्तनकार, प्रतिभावंत कलावंत, सहभागी होणार असल्याची माहिती स्वामीजींचे वंशज बाळासाहेब पांडे मांजरमकर यांनी दिली आहे
कार्तिक वद्य एकादशी दि. ९ डिसेंबर शणिवार रोजी सकाळी स्वामींच्या समाधीचे पूजन, रात्री ७ वाजता वे. शा.सं. रमेश गुरु राहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाअभिषेक सोहळा, रात्री ९ ते १२ विठ्ठलेश्वर भजनी मंडळ, जिजामाता महिला भजनी मंडळ, महात्मा बसवेश्वर भजनी मंडळ, हनुमान सेवा दल, गुरुदेव सेवा मंडळ,नागेशवर भजनी मंडळ आदी भजनी मंडळ मांजरम ता.नायगाव यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
कार्तिक वद्य द्वादशी १० डिसेंबर रविवार रोजी स्वामीच्या पुण्यतिथीचा मुख्यसोहळा, सकाळी प्रा. भूषण कुलकर्णी व श्रीनिवास बाळासाहेब पांडे यांच्या हस्ते वे.शा.संपन्न रमेश गुरू यांच्या मार्गदर्शनाखाली समाधी पूजन, दुपारी १ ते ३ स्वामीच्या पुण्यतिथीचा सोहळा वेद शास्त्रीय कार्यक्रमाने साजरा होईल.
सर्वश्री वे.शा.सं. रमेश गुरु राहेरकर, श्यामराव जोशी उमरीकर,धनंजय गुरू कापसीकर, उमेश गुरू नायगावकर, बाळासाहेब कुलकर्णी बरबडेकर,विठल महाराज टेंभुर्णीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक विधीने संपन्न होणार आहे. दुपारी ३ वा.महंत श्री.विशुद्धानंद महाराज सिद्धतीर्थधाम मठ संस्थान हळदा ता.कंधार यांचा प्रवचन व दर्शन सोहळा. सायंकाळी ठीक ४ वा. ह.भ.प. बाबू गुरु शिराढोणकर यांचे स्वामीच्या गुलालाचे भजन, त्यांना हार्मोनियमची साथ अनंतराव मंगनाळे, गायन सुधाकरराव कुलकर्णी चोराखळीकर, विनायक शिंदे, परमेशवर केते महाराज, विकास भूरे महाराज, तबला साथ हरिप्रसाद पांडे मांजरमकर, मृदंग साथ बालू महाराज पांडे यांची राहणार आहे.
रात्री ९ ते ११ विनोदाचार्य ह.भ.प.
चंद्रकांत महाराज लाठकर यांचे हरि कीर्तन, रात्री ११ ते १२ दरम्यान बालकलावंत कु. वीरा गणेश हाके यांचा भक्तीगीत, गवळण व धार्मिक गीतावर आधारित सुगम भक्ती गीत संध्या कार्यक्रम तर भजनसम्राट विश्वनाथ भोगले यांचा 'भजनसंध्या' कार्यक्रम साजरा होणार आहे. विशेष आकर्षण मास्टर नटसम्रा इशांत नांदेडकर युट्युब फेम कोकण यांचा गौळण ,भारुड, यावर नृत्याविष्कार कार्यक्रम होणार आहे.
रात्री 12.30 वा.भजन संध्या या
हार्मोनियम साथ नामदेव पांचाळ तबलावादक तथा तळवळकर गुरुजी यांचे शिष्य प्रशांत गाजरे नांदेड यांचे शिष्य अभिषेक देशपांडे व हरिप्रसाद पांडे यांचे तबला वादन ,रात्री संगीत भजन संध्या होणार असून यामध्ये मारुती महाराज मांजरमकर फलटण जिल्हा सातारा, संगीत अलंकार प्राप्त, शंकर बिरादार, प्रा. माधव किन्हाळकर,गणेश हाके,नामदेव पांचाळ, कु. रितू बेळकोणीकर, कु.भाग्यश्री पांडे, त्र्यंबक स्वामी, पवन गादेवार, रमेश पा. खैरगावकर, बालाजी चौधरी, शरद पा. कोलंबीकर, शंकर पाटील मुगावकर, श्याम पाटील नरंगलकर ,रावसाब पाटील, डॉ. मनोहर तेलंग, दत्ता पाटील कोलंबिकर व कोलंबी, नरंगल, मोकासदरा, मांजरम वाडी,गोधमगाव,केदारवडगाव येथील भजनी मंडळी यांचा कार्यक्रम होणार आहे.मृदंग साथ ऋषीकेश बेळीकर, अमोल लाकडे, ढोलकी सूर्यकांत पातावार, ढोल ज्ञानेशवर बैस, ट्रीबलसाथ हरिप्रसाद पांडे, बासरीवादन विजय द्रोणाचार्य हार्मोनियम गणेश हाके सर यांची साथ लाभणार आहे.
कार्तिक वदय त्रयोदशी ११डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी ७ वाजता वे.शा.सं. संतोष गुरु राहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांत संतोष गुरू राहेरकर यांच्या हस्ते स्वामीच्या समाधीचा अभिषेक, नंतर स्वामीच्या पादुका प्रतिमा यांची मांजरम नगरीतून मुख्य रस्त्यावर भव्य पालखी मिरवणुकीचा सोहळा होणार आहे. या मध्ये रामकीशन पांचाळ नरसीकर, विश्वनाथ भोगले नांदेडकर, शाहीर सूर्यकांत पातावार,सौ.लाकडे ताई यांचा भारुडी भजनाचा कार्यक्रम होईल. सकाळी १० वा. स्वामी वशंज हरिप्रसाद बाळासाहेब पांडे, अर्णव देसाई यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याच्या प्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
स्वामी वैष्णवानंद पुण्यतिथी साजरी
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा