maharashtra day, workers day, shivshahi news,

हिंदूंचे श्रद्धास्थान अयोध्या येथे प्रभु श्रीरामाललांची २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.

श्रीराम जन्मभूमी अयोध्या पूजीत अक्षता कलश यात्रा व भजनसंध्या 

Shriram birth place Ayodhya , Prabhu Sriramalal will be passed away on January 22. , nanded , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा , नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नांदेड : ५०० वर्षाचा संघर्ष व ७४ वेळेस लढा देऊन हिंदूंचे श्रद्धास्थान अयोध्या येथे प्रभु श्रीरामाललांची २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. ह्या कार्यक्रमास प्रत्येक रामभक्त जाऊ शकणार नाही त्यासाठी अयोध्या येथील पूजद अक्षता, श्रीरामलला ची प्रतिमा व श्रीराम मंदिर विषयी माहिती असलेले पत्रक हे निमंत्रण म्हणून प्रत्येक राभक्ताच्या घरी वितरण करण्याचे अभियान १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान सम्पूर्ण भारत भर होणार आहे.नांदेड मध्ये अयोध्या येथील पूजत अक्षता २२ डिसेंबर रोजी येणार आहेत त्यांचे स्वागत म्हणून नांदेड मधील मुरली मंदिर, भोजलाल गवळी चौक, सराफ बाजार ते पंचवटी हनुमान मंदिर, महावीर चौक या मार्गाने कलश यात्रा काढण्यात येणार आहे ह्या कलश यात्रेमध्ये रथामध्ये कलश, भगवदगीता, भजनी मंडळ, ढोलताशा, संत व सर्व रामभक्त असा सहभाग राहणार आहे.

               तसेच सायं.६ वाजता श्री पंचवटी हनुमान मंदिर महावीर चौक येथे अक्षता पूजन संतांच्या हाताने करून ते अक्षता भजनसंध्या कार्यक्रमात उपनगर, व प्रखंड प्रमुख व सह प्रमुख यांना वितरण साठी देण्यात येणार आहेत व ज्या कारसेवकांनी कारसेवा करून ह्या श्रीराम मंदिरासाठी संघर्ष केला आहे त्यांचे सुद्धा ह्या कार्यक्रमात स्वागत होणार आहे.ह्या कार्यक्रमाची आतुरता रामभक्तामध्ये आहे व ह्या कार्यक्रमासाठी रामभक्त श्रद्धेने, उत्साहात कार्य करत आहेत.ह्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सर्व रामभक्तांची, सर्व लोकांची अशी लोकोत्सव समिती करत आहे.लोकोत्सव समिती तर्फे सर्व रामभक्तांना विनंती करण्यात येते कि जास्तीत जास्त संख्येने ह्या कलश यात्रा व भव्य भजन संध्या कार्यक्रमात सहभाग घ्यावा.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !