मोठ्या उत्साहात होणार स्वागत - चेअरमन अभिजीत पाटील
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
दि.०७.१२.२०२३ रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील यांनी पंढरपूर येथील आपले संपर्क कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन वैकुंठ चतुर्थीच्या हरीहर भेटीचा सहयोग साधून श्रीक्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा मैदान येथे पुजनीय पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे भव्य शिव महापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे जाहीर केले. सदरचा कथा सोहळा दुपारी ०१.०० ते ०४.०० या कालावधीमध्ये होणार आहे. सदर सोहळ्यास येणाऱ्या भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था देखील केलेली आहे. या धार्मिक कार्यक्रमाने नवीन वर्षाचे स्वागत होणार असून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे या कथा सप्ताहास पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेप्रमाणे सुमारे १० लाखाच्या आसपास भाविक येणार असल्यामुळे पंढरपूराची आर्थिक उलाढाल वाढणार आहे. तसेच पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचीही श्री विठ्ठलाच्या नगरीमध्ये कथा व्हावी अशी पुर्वीपासून इच्छा असल्याचे त्यांचे भाच्चे श्री.समीर यांनी सांगितले.
यावेळी चेअरमन श्री अभिजीत पाटील म्हणाले की, या धार्मिक कार्यक्रमामुळे पंढरपूर धार्मिक पर्यटन केंद्र करण्याचा नवीन संकल्प असल्याचे सांगितले. याबरोबरच पंढरपूर शहर व आसपासच्या भागातील देवतांची पुरातन ऐतिहासिक मंदिरे यांची माहिती या सोहळ्याच्या ठिकाणी ठेवणार असल्यामुळे सर्व भाविक भक्तांना संपुर्ण पंढरपूर शहर व परिसराची देवतांची इथंभूत माहिती मिळणार असून तेथील देवस्थानच्या गांवाचीही आर्थिक उलाढाल वाढणार असल्याचे सांगितले.
पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे २४ डिसेंबर रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आगमन होणार असून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास भेट देवून पंढरपूर येथे आगमन झालेनंतर श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेवून शहरामध्ये त्यांची प्रदक्षिणा मार्गावरून भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी पंढरपूर व परिसरातील भाविक भक्तगणांना, नागरिकांना सदर कथा सोहळ्याचा लाभ घेणेसाठी श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांनी आवाहन केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा