शिंदे फडणविस सरकारचा नवा जीआर ठरला उपयुक्त - विजय पाटील डांगे
शिवशाही वृत्तसेवा, धर्माबाद (तालुका प्रतिनिधी नारायण सोनटक्के)
तहसिल कार्यालयात दिनांक 12 डिसेबर रोजी घेण्यात आलेल्या संजय गांधि निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष विजय पाटील डांगे यांच्या चाणाक्षतेमुळे अपात्र ठरणाऱ्या 13 लाभार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 20 ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या नुतन जिआर या ठिकाणी उपयुक्त ठरला आहे हे विशेष.
समितीचे अध्यक्ष विजय पाटील डांगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली. या बैठकीस तहसिलदार शंकर हांदेश्वर , समितीचे सदस्य सौ. प्रणिता सतिष शिंदे,संजय कदम, सावरगावे बालाजी, रामचंद्र सोंमठाणे, फिरदौस मॅडम आदींची उपस्थिती होती. या बैठकीत एकूण आलेल्या अर्जनुसर 157 अर्ज मंजुर करण्यात आले आहेत.
या पैकी 13 लाभार्थ्यांचे अर्ज हे अपात्र ठरत होते मात्र समितीचे अध्यक्ष विजय पाटील डांगे यांनी चानक्षते शिंदे फडणविस सरकारचा 20 ऑगस्ट चा जीआर चा संदर्भ घेत ती 13 प्रस्ताव मंजुर केले आहेत. राज्यांचे विद्यमान सरकार सर्वच स्तरावर योग्य दिशेनं काम करत आहे.त्याच धर्तीवर निराधार योजना संदर्भात देखील किचकट ठरणाऱ्या अटी बाबत सुधारित जीआर काढला आणि तो जीआर या ठिकाणीं उपयुक्त ठरला. समितीचे अध्यक्ष विजय पाटील डांगे यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीतून अपात्र ठरणाऱ्या अर्जांचा बारकाईन अभ्यास करून राज्य सरकारच्या नवीन परिपत्रकाचा संदर्भ घेत सदरील अर्ज मंजुर केले आहे.
आ.राजेश पवार यांच्या समुहातील अतिशय विश्वासू सहकारी म्हणून विजय पाटील डांगे सर्वश्रुत आहेत. गोरगरीब निराधारांना यथोचित न्याय मिळावा म्हणुन आमदार महोदयांनी त्यांची समिती अध्यक्ष म्हणून निवड केली होती त्यांच्यातील चाक्षनतेने आज 13 जनाचे अर्ज पात्र ठरले असून आ.राजेश पवार यांनी केलेली निवड सार्थकी ठरली आहे हे या कृतीतून दिसून येते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा