विज्ञान प्रदर्शनी म्हणजे वैज्ञानिक घडविण्याची कार्यशाळाच : शिवाजीराव काळुसे...
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा जिल्हा प्रतिनिधी आरिफ शेख
सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव राजा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांचा केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनच विकसित होत नाही, तर त्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया रोवला जात असतो त्यामुळे विज्ञान प्रदर्शनी म्हणजे वैज्ञानिक घडविण्याची कार्यशाळा असल्याचे प्रतिपादन कामक्षा देवी विद्यालयाचे संस्थाध्यक्ष शिवजीराव काळुसे यांनी केले.किनगांव राजा येथेयेथे आयोजित ५१ व्या दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात शिवाजीराव काळुसे बोलत होते.
याप्रसंगी ठाणेदार दत्तात्रय वाघमारे, गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे, विज्ञान शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष दीपक नागरे, गट समन्वयक संतोष सोनुने,विस्तार अधिकारी मधुकर रिंढे, केंद्रप्रमुख गैबीनंद घुगे, विलास आघाव, गिरीष मखमले, दिलीप काकडे, प्रवीण गवई, प्राचार्य उद्धव दराडे ,प्रल्हाद काळुसे,संजय काळुसे आदि प्रमुख अतिथी होते.यावेळी प्रदर्शनीत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थी, शिक्षक, परिचर यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान महत्वाचे असून, वैज्ञानिक संकल्पनेचा वापर करीत साध्या पद्धतीने समस्यांची सोडवणूक करण्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी सहभागी तसेच निरीक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रद्धा व अंधश्रद्धा यातील पुसट रेषा कशी मिटविता येईल ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.दीपक नागरे यांनी कामक्षा देवी विद्यालयाच्या प्रदर्शनी आयोजनात नाविन्याचा उहापोह करीत,विद्यार्थ्यांनी मूलभूत वैज्ञानिक संकल्पनांमधून उपकरण निर्मिती कशी करावी? ह्याबाबतीत मार्गदर्शन केले.माध्यमिक गटामध्ये २४ तर प्राथमिक गटामध्ये ४२ शाळानी सहभाग घेतला होता.
यशस्वीतेसाठी प्राचार्य उद्धव दराडे, संजय केकान, प्रकाश सोनुने, रामदास सानप ,गजानन मुंढे,राजीव मांटे, गजानन थिगळे, नितीन खरात, संजय काळुसे,उद्धव राठोड, रामेश्वर हरकळ,धम्मपाल गवई,शाम सोळंके, गोपाल पवार,गजानन काळुसे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय केकान,तर आभार प्रदर्शन रामदास सानप यांनी केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा