सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली येथे सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर जिल्ह्यातून लाखो समाज बांधव पायीदिंडी व वाहनाने मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्य मागासवर्ग आयोग सर्वेक्षण संदर्भात चर्चा करण्यात आली.
हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात गुरूवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सकल मराठा समाजाची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार जिल्हयातील लाखो मराठा बांधव सहभागी होण्याच्या दृष्टीने गावपातळीवर जनजागृती करण्याचे ठरले. जिल्ह्यातील नर्सी नामदेव येथुन मराठा बांधवाची पायी दिंडी आंतरवाली सराटी येथे जाणार आहे. यासंदर्भात नोंदणी करण्याविषयी चर्चा करुन निर्णय घेण्यात आला. याचबरोबर जिल्हयातील गावपातळीवरील मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार वाहनाने आंतरवाली सराटी येथे जाऊन पायीदिंडीत सहभागी होणार आहेत. याविषयीही जनजागृती व व्यापकता जिल्ह्यातील सहभाग यावर निर्णय घेण्यात आला. पायी दिंडीत लाखोच्या संख्येने जिल्हयातील मराठा बांधवाचा सहभाग राहणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या संकल्प विकास यात्रेत मराठा बांधवावर गुन्हे दाखल करण्यात आले हे गुन्हे तातडीने मागे घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांना शिष्टमंडळ भेटणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे कुणबी मराठा शोध मोहिमेची व्यापकता वाढीसाठी आवश्यकता असुन अद्यापही मोडी लिपी इतर दस्तावेज शोध मोहिम प्रशासनाने करावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
या अगोदर कुणबी नोंदी सापडल्या आहेत. परंतु आजुनही कुणबी नोंदीचा शोध दस्तावेजाचे सुक्ष्म निरीक्षण करण्याची मागणी करण्यात येत आहे. गावपातळीवर नोंदी व सर्वेक्षण सुक्ष्म पद्धतीने करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीला जिल्हाभरातील मराठा बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा