शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा या गावात गणेश सोनाजी डोंगरे यांच्या राहत्या घरी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन शेतीतील सर्व कापूस अंदाजे ४० क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या नविन घराचे बांधकाम दुसऱ्या ठिकाणी सुरू असुन. त्या घराच्या बांधकामासाठी त्यांनी कपाटात ३ लाख रुपयांची रोकड घरात आणून ठेवलेली होती, ती रोकड आणि घरातील दागदागिने सुध्दा आगीत जळून खाक झाले.
घरातील खाण्याचे धान्य, भांडे, कपडे, सर्व उपयोगी वस्तू जळुन गेलेल्या आहेत. तब्बल बारा ते तेरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा