गुन्हे मागे घेण्यासाठी सकल मराठा समाजाचे शिष्ट मंडळ भेटले
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली, जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली (प्रतिनिधी)- विकसित भारत संकल्प यात्रेला राजकीय प्रवेश बंदी असताना विरोध केल्यामुळे सकल मराठा समाजाच्या बांधवावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे परत घेण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ अतिरिक्त पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांना भेटले.
शनिवार दि.३० डिसेंबर रोजी अतिरिक्त पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांची सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळांने भेट घेतली. ओबीसीतुन मराठा आरक्षण या मागणीसाठी समाज संविधानीक पद्धतीने आंदोलन करीत आहेत. जिल्हयातील ग्रामपंचायतीने ग्र्रामस्थांना विश्वासात घेऊन मराठा आरक्षण मिळत नाही. तो पर्यंत राजकीय पक्षाच्या पुढार्यांना, नेत्यांना, राजकीय उपक्रमांना प्रवेश बंदी केलेली आहे. काही ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे ठराव घेऊनही प्रशासनाला तसे कळविले आहे. विकसित भारत संकल्प यात्रा या नावाने शासकीय यंत्रणा गावपातळीवर जात असली तरी राजकीय प्रचारात्मक पद्धतीचे आवाहन केल्यामुळे खरबी, मेथा, टाकळी येथील गावकरी यांनी संविधानीक पद्धतीने विरोध केला.
परंतु या ग्रामस्थावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे परत घ्यावेत अशी मागणी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळांने अतिरिक्त पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्याकडे केली आहे. अन्यथा गुन्हे परत न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असुन यात्रे संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर याना अवगत करण्यात येणार आहे. या शिष्टमंडळात सकल मराठा समाजाचे बांधव सहभागी होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा