छगन भुजबळ यांच्या विराट सभेचे नियोजन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
ओबीसी समाजाचे नेते ना.छगन भुजबळ यांची नववर्षांच्या प्रारंभी नरसी येथे होणाऱ्या विराट सभेच्या नियोजनासाठी दि.२२ डिसेबंर रोजी ओबीसी नायगाव तालुका संघर्ष समितीच्या बैठकीचे आयोजन दुपारी दोन वाजता शहरातील प्रसिद्ध श्री मार्कंडेश्वर मंदिरात करण्यात आले आहे.
ओबीसी आरक्षणाचा वाटा इतर कोणत्याही वर्गाला देण्यात येवुनये आपल्या आरक्षणाच्या रक्षणासाठी जन जागरण करण्यासाठी तालुक्यातील गावागावात बैठकीचे नियोजन व ना.भुजबळ यांच्या सभेच्या पुर्व तयारी च्या नियोजना साठी ओबीसी नेते डाॅ बी.डी.चव्हाण, अविनाश भोसीकर व महेंद्र देमगुंडे हे बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
आपल्या हक्कासाठी, हक्कच्या रक्षणासाठी लोकशाहीचा रक्षक आणी बहूसंखेने असलेल्या ओबीसी समाजाने वज्रमुठ आवळली असून जनजाग्रती करण्यासाठी गाव पातळीवर बैठकाचे आजोनाचे नियोजन करण्यात येणार आहे.ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून शासनाला जागृत करण्यासाठी भव्य दिव्य एका सभेचे आयोजन नरसी येथे करण्यात आले आहे.
नायगाव तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी दि.२२ डिसेंबर शुक्रवारी दुपारी दोन वाजता आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीस उपस्थित रहावे असे आव्हान ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा