maharashtra day, workers day, shivshahi news,

मी सरकारच्या मंत्र्यांना ही ठोकून काढतो अन् सरकारलाही - संजय गायकवाडांचा सरकारला घरचा आहेर

संविधानामध्ये घटनात्मक बदल करून जी जात या भारतात नाहीच, ती जात त्यात लिहली गेली - संजय गायकवाड
Mla sanjay gaikwad, CM eknath shinde, Buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे सरकारविरोधातच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मी सरकार म्हणून सरकारची कधीच पर्वा करत नाही. मी सरकारच्या मंत्र्यांना ही ठोकून काढतो, सरकारला ही ठोकून काढू शकतो, असे वक्तव्य गायकवाड यांनी केले आहे. 
याचबरोबर संविधानात बदल करणाऱ्यांनाही त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरला आहे. ज्या संविधानात 36 क्रमांकावर आरक्षण दिलेले आहे. कोण्या हरामखोरांने केले आहे, तेवढे आम्हाला बदलून द्या. बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने का होईना तुमची बाजू सक्षम पणे मांडेल. आपल्यातलाच कार्यकर्ता म्हणून मांडेन, असे गायकवाड म्हणाले.  
संजय गायकवाड बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाच्या आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. धनगर समाजाला वेगळे आरक्षण द्यावे किंवा त्यांना इतरांचे हिसकावून घ्यावे, अशी कोणतीच मागणी धनगर समाजाची नाही. संविधानामध्ये घटनात्मक बदल करून जी जात या भारतात नाहीच, ती जात त्यात लिहली गेली. त्यामध्ये जर वेगळा बदल केला तर या समाजाला वेगळे आरक्षण देण्याची गरज नाही, असे गायकवाड म्हणाले.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !