आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते उद्घाटन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
भारतीय जनता पार्टी जिल्हा केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्टद्वारे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त रुग्ण तपासणी व मोफत औषध वाटप करण्यात आले. माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सानवी क्लिनिक, हनुमान नगर येथे आयोजित केलेल्या या रुग्ण तपासणी व मोफत औषध उपचार शिबिराचे उद्घाटन आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, नारायण खेडकर, सुभाषचंद्र लदनिया, मनोज बांगर, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी डॉ. पंजाब लोंढे, अनिल मस्के, अभिजात डुब्बेवार, आशिष रुणवाल, प्रफुल ढाले, अजय होकर्णे, गणेश चव्हाण, भगवान कावरखे, अजय नालींदे, संघपाल लोणकर, उमेश घोंगडे, सुनील भवर, रेणुदास चित्तेवार, रवी शिंदे, राहुल अकमार, वैभव बुरसे यांनी पुढाकार घेतला. तर केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्टचे जिल्हा संयोजक संदीप लाहोटी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा