निधोना ग्राम पंचायत येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
शिवशाही वृत्तसेवा, तात्याराव बनसोडे जिल्हा प्रतिनिधी फुलंब्री
फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे ४डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका विविध मागण्यासाठी संपावर आहेत.परंतु आज २२ दिवस होऊन सुद्धा शासनाचा काहीच प्रतिसाद मिळत नाही.त्यातच आय सी डी एस आयुक रूबब अग्रवाल हे संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांत दहशत निर्माण करीत आहे.त्यांच्या निषेधार्थ आयटेक च्या वतीने निधोना ग्राम पंचायत समोर आयुक्तांच्या पत्राच्या विरोधात निदर्शनं करून होळी केली.
व शासनाचा निषेध व्यक्त केला.यात मैना गायकवाड, नंदिनी व्यवहारे, उज्वला आव्हाळे, रंजना सोनवणे, सगुणा शिंदे, शितल राऊतराय, पुजा भिवसणे, अंजना फुके, गीता नलावडे, गीता जारवाल, रंजना राऊतराय, जया राऊतराय, शोभा काटकर, पार्वती पल्हाळ, सुमित्रा सोनवणे, रेखा काकडे, कल्पना म्हस्के, आशा गोसावी, सविता भिवसणे, काशिगंगा मोटे, रंजना चोपडे, संगिता मोटे, इत्यादी अंगणवाडी सेविका व मदतनीस हजर होत्या..
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा