यादीतील अपात्र लाभार्थ्यांनी 5 जानेवारी पर्यंत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
जिल्हा परिषद सेस योजना सन 2023-24 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरवणे या योजनेसाठी लाभार्थींचे पंचायत समिती स्तरावरुन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेलया अर्जांची छानणी करुन पात्र व अपात्र झालेल्या लाभार्थींची यादी पंचायत समितीच्या नोटीस बोर्डावर व जिल्ह्याच्या www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
यादीतील अपात्र लाभार्थींनी त्यांचे आक्षेप दि. 5 जानेवारी, 2024 पर्यंत गटविकास अधिकारी पंचायत समिती अथवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयास सादर करावेत. विलंबाने प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद विद्यार्थ्यांनी अथवा त्यांच्या पालकांनी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवड समितीचे अध्यक्ष अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा सह अध्यक्ष नामदेव केंद्रे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सदस्य सचिव राजू एडके व सर्व निवड समिती सदस्यांनी केलेले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा