maharashtra day, workers day, shivshahi news,

पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने आमदार राम पाटील रातोळीकर यांना निवेदन

पत्रकारांच्या हक्कासाठी देशभरात काम करत आहे वाईस ऑफ मीडिया संघटना
MLA Ram Patil nightly , Vice of Media Association ,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
रविवार दि.१० डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील रातोळी येथे विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने भेट घेऊन त्यांना पत्रकारांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.

व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकारांची देशव्यापी संघटना असून संपूर्ण देशभरात ३७ हजार सदस्य आहेत. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी संघटना सातत्याने कार्यरत आहे. नुकतेच बारामती येथे व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय शिखर अधिवेशन पार पडले. यात राज्यभरातून दीड हजार पत्रकार बांधव सहभागी झाले होते. 

या अधिवेशनात पत्रकारांशी संबंधित विविध १४ ठराव एकमताने पारित करण्यात आले. या ठरावाची समीक्षा करून शासनाच्या वतीने यावर तातडीने निर्णय घेण्याच्या दृष्टीने सध्या नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पत्रकारांच्या मागण्या संदर्भात हा मुद्दा उपस्थित करावा अथवा माननीय मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन हे ठराव शासन पातळीवर मंजूर करण्यास सहकार्य करण्यासाठी नायगाव तालुका व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर यांना निवेदन देण्यात आले.. यावेळी पत्रकारांच्या निवेदनपर मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा करून त्या संदर्भाने व्हॉईस ऑफ  मीडियाचे  संस्थापक अध्यक्ष  संदीप भाई काळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून सर्व मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा ही आमदार रातोळीकर यांनी केली.

यावेळी नायगाव व्हॉईस मीडियाचचे नायगाव तालुकाध्यक्ष नागेश पाटील कल्याण,  डिजिटल मीडियाचे तालुकाध्यक्ष भगवान शेवाळे,वसंत जाधव, बापुराव गुरुजी बडूरे,नागोराव बंडे,संदीप कांबळे,प्रदीप झुंझारे आदी उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !