बाबासाहेब आंबेडकर यांना महिलांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कल अंतर्गत नारीशक्ती महिला प्रभाग संघाचा वतीने सार्वजनिक वाचनालय कुंटूर येथे मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती या मासिक बैठकीसाठी आयोजन आयसीआरपी रेखाताई अनिल कांबळे यांच्या नियोजनातून करण्यात आली यावेळी नारीशक्ती प्रभाग संघाचे अध्यक्ष सौ. कोमल मोहन गजभारे व सचिव सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व महिलांनी यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .
व नारीशक्ती प्रभाग संघाची बैठक आयोजित करून मासिक आढावा घेण्यात आला यावेळी बळेगाव सालेगाव , कोकलेगाव ,कुंटूर ,सातेगाव ,येथील ग्राम संघ व पदाधिकारी आयसीआरपी यांनी आपापल्या गावातील अडीअडचणी सांगून सदर महिला वर्ग उपस्थित राहून आपल्या केलेल्या कामाचा नियोजित आढावा बैठक घेण्यात आली व सर्व माहिती सांगून या बैठकीत समारोप करण्यात आला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर वाचन करून महिलांसाठी केलेले कार्य व त्यांचे आजही महिला वर्गांना विविध योजनांचा मिळून दिलेला लाभ सर्व गोष्टीवर प्रकाश टाकत माहिती देण्यात आली. नारी शक्ती महिला प्रभाग संघा कुंटूर यांच्या वतीने महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा