मांजरम येथे वैष्णवानंद स्वामी यांची पुण्यतिथी संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव येथील मुख्य रस्ता ते वैष्णावानंद स्वामी मठ संस्थान , ग्राम दैवत महादेव मंदीरा कडे जानाऱ्या भविकासाठी सोय व्हावी या उद्देशाने आ.राम पाटील रातोळीकर यांनी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबद्दल स्वामी वैष्णवांनंद पुण्यतिथी दिनी आ राम पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
स्वामी वैष्णवांनंद मठा कडे जाणाऱ्या रस्त्याची गरज भक्त गणांना नितांत होती. या रस्त्याच्या उभारणी साठी विधान परिषद सदस्य आ.राम पाटील रातोळीकर यांनी दहा लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्या निमित्त नुकतेच वैष्णवानंद स्वामी यांची पुण्यतिथी मांजरम येथे संपन्न झाली.
वैष्णवानंद मठ संस्थानांचे विश्वस्त बाळासाहेब पांडे यांनी आ.राम पाटील रातोळीकर यांच्या कडे रस्त्याच्या कामासाठी निधी मागितला होता. वैष्णावानंद स्वामी मठ संस्थानास भेट दिली गावातून वाहणाऱ्या गोदडी नाल्यातून जाण्यासाठी रस्ता आहे. हा रस्ता विकसीत करण्यासाठी निधीची गरज होती ही बाब प्रत्यक्ष बघून आमदार मोहदयानी दहा लाख रूपयांचा निधी दिला.
या निमित्ताने येथील मठसंस्थानात आ.राम पाटील रातोळीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हळदा सिद्धतीर्थ धामचे गुरूवर्य विशुद्धा नंद महाराज हळदेकर , स्वामींचे वंशज पत्रकार बाळासाहेब पांडे, उपसरपंच बालाजी माली पाटील, विनायक पाटील शिंदे, विठ्ठलराव कते, अनंतराव मंगनाळे, अँड.निलेश देशपांडे, विकास भुरे, गुत्तेदार माधव पवार आदी गावकरी उपस्थित होते.
स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त तिन दिवस अभिषेक भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन,भक्ती संगीत व सांकृतिक सोहळा व पालखी मिरवणूक पार पडली. रमेश गुरू राहेरकर यांच्या मार्गदर्शना खाली पूजा अर्चा, विशुद्धानंद महाराज यांचे प्रवचन, विरा गणेश हाके हिचे गायन, ह.भ.प.चंद्रकांत महाराज लाठकर यांचे कीर्तन, विषवनाथ भोगले यांची भजन संध्या, तर सर्वात आकर्षक ठरलेला कार्यक्रम इशांत डान्सर यांची गौळण, भारुड, या सह विविध कलाकृतीचे नृत्य स्वामी पुण्यतिथी सोहळ्याचे आकर्षण ठरले.
स्वामी च्या पुण्यतिथी सोहळ्यात नायगाव च्या तहसीलदार मंजुषा भगत यांनी भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले त्यांचे सौ सुनंदा बाळासाहेब पांडे व अश्विनी उमेश नायगावकर यांनी शाल श्रीफळ व स्वामींचा प्रसाद देऊन स्वागत केले. या वेळी सरपंच प्रतिनिधी रावसाहेब शिंदे, गणपत शिंदे, तलाठी मुधळे, बाळासाहेब कुलकर्णी, धनंजय कापसिकर, श्याम जोशी, विठल देशपांडे, हरिप्रसाद पांडे, सुरेश शिंदे, आदी गावकरी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा