शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे त्वरित करावे
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
तालुक्यात दि.२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मेघगर्जनेसह गारपीट जोरदार पाऊस झाल्यामुळे कापूस, तुर, हरभरा, ज्वारी फळबाग, पालेभाज्या आदीसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे त्वरित करावे तसेच शासनाने शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी केली आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून नायगाव तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. रविवारच्या मध्यरात्रीनंतर विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर मंगळवारी, दि.२८ रोजी सायंकाळी पुन्हा भोपाळा ,टाकळी बु,शेळगाव, कुंचेली,धुप्पा , डोणगाव,आजणी,बिजुर भागातील गावांमध्ये दोन दिड तास झालेल्या मेघगर्जनेसह गारपीट व अवकाळी पावसामुळे तुर ,कापुस, हरभरा , ज्वारी, गहू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.काही भागात ढगफुटी प्रमाणे पाऊस झाल्यामुळे शेतीतील पिकात दिड ते दोन फुट पाणी साचले त्यामुळे ज्वारी, गहू,हरभरा व तुर कापुस पिकांचे नुकसान झाले.
होते.
aaaaa
कृषी विभाग व तहसील विभाग शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली गारपीट झालेल्या भोपाळा टाकळी बु शेळगाव गौरी गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसील प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार कृषी विभाग आणि तहसील कार्यालयाकडून कार्यवाहीस सुरुवात करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा