गटविकास अधिकाऱ्याकडे नागरिकांची तक्रार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
25हजार लोकसंख्या वर एक ग्रामसेवक
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसेवक नागेश येडसनवार ,नायगाव तालुक्याला राहुन असून गावात त्यांचे दुर्लक्ष होत आहे. चार ते पाच दिवसाला येत असतात त्यामुळे गावात त्यांचे लक्ष नाही नालीची घाण पाणी रस्त्यावर राहते नालीमध्ये पाणीपुरवठ्याचा पाईप फुटल्यामुळे सदर पाणी हे नळाद्वारे गावात येत असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक ताप सर्दी असे विविध आजाराला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर कचऱ्याचे साफसफही केली जात नाही.
रस्त्यावर कचऱ्याचे ठिकाणे सासले आहे. कुंटूर येथील ग्रामसेवकयाचे दुर्लक्ष असल्यामुळे बदली करण्यात यावी कारण ग्रामसेवकाला पाच गावे असून 25 हजार लोकसंख्या चा वर एक ग्रामसेवका नागेश्वर येडसनवार हे आहेत. कुंटूर लोकसंख्या -6881,नरसी लोकसंख्या - 15432,ताकबीड लोकसंख्या -1000, शेळगाव छत्री लोकसंख्या - -1762. त्यांना कुंटूर मध्ये येण्यास वेळ नाही .अशी तक्रार कुंटूर येथील रसूल मख्खन शेख काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष नांयगाव यांनी गटविकास अधिकारी आर एल वाजे नायगाव यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे.
त्यांच्या या अर्जामध्ये कुंटूर येथील ग्राम विकास अधिकारी नागेश्वर येडसनवार यांची गावातून हकालपट्टी करण्यात यावी गेल्या किती दिवसापासून पाण्यात ब्लिचिंग पावडर नाही पाणी हे दूषित असून . ओढ्याचे पाणी घाण वासयुक्त पाणी आळी युक्त पाणी पाजवत आहेत. तरीही कोणी दखल घेत नाही कुंटूर येथे वार्ड नंबर चार मध्ये मस्जिद्दीच्या पाठीमागे असलेल्या गल्लीमध्ये मुस्लिम समाज वसाहत असून यामध्ये नाली तुटली असून त्या नाली मधल्या पाईपलाईनचे पाणी आत मध्येच येत असून सदर पाणी हे नागरिकांना नळाद्वारे दिले जाते वेळोवेळी सांगून व निवेदन देऊनही तक्रार करून ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी लक्ष देत नाहीत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत.
असल्याची तक्रार रसूल मखनसाब शेख कुंटुरकर यांनी केले आहे. सदर गट विकास अधिकारी यांनी लवकरच या प्रकरणाचे चौकशी करून ग्रामविकास अधिकारी नागेश्वर येडसनवार यांची हकालपट्टी करण्यात यावी त्यांना पाच गावे असल्यामुळे त्यांना कुंटूर येथे लक्ष देण्यास वेळ नाही व तालुक्याचे ठिकाणी राहून कारभार बघत असल्याने त्यांना गावातून हाकलून देण्यात यावी अशी मागणीही शेख रसूल मखनसाब अल्पसंख्यांक काँग्रेस युवक सेलचे तालुका उपाध्यक्ष यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा