maharashtra day, workers day, shivshahi news,

गुरु गोविंद सिंग यांच्या दोन लहान मुलांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक म्हणून दि 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्याची घोषणा

निरीक्षणगृह व बालगृहात वीर बाल दिवस कार्यक्रम साजरा

Celebrating Children's Day program , Hingoli , Guru Gobind Singh ,shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी, हिंगोली चंद्रकांत वैद्य
हिंगोली), दि. 27 : गुरु गोविंद सिंग यांच्या दोन लहान मुलांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक म्हणून दि. 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्याची घोषणा मा. प्रधान मंत्री यांनी केली आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत कार्यरत सरस्वती मुलींचे निरीक्षणगृह व बालगृह, सावरकर नगर, हिंगोली व श्री स्वामी समर्थ बालगृह, खानापूर चित्ता ता.जि.हिंगोली या संस्थेत वीर बाल दिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात चित्रकला, निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा व भाषण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी माया सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण, समुपदेशक सचिन पठाडे, निरीक्षण गृह अधीक्षक आर. यु. भुरके, शिक्षक शंकर घ्यार, काळजी वाहक संगिता भांदुर्गे, वनिता पवार, रेखा चांगाडे, रमेश पवार तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी, कर्मचारी व बालगृहातील प्रवेशित बालके उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !