अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सदस्यांची बैठक
शिवशाही वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी, हिंगोली चंद्रकांत वैद्य
हिंगोली जिल्ह्यातील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सदस्यांची हिंगोली येथील शासकीय विश्रांमग्रह येथे आज दि 26/12/2023 रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने,केंद्रीय उपाध्यक्ष युसूफ खान,केंद्रीय महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष कैलासबापू देशमुख,महाराष्ट्र प्रदेश संघटक गोपालराव सरनायक यांच्या मार्गदर्शनाखाली हि बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी महेंद्र पुरी तर महाराष्ट्र प्रदेश संघटक गोपालराव सरनायक यांच्या प्रमूख उपस्थितीत हि बैठक घेण्यात आली.
या वेळी जिल्हाध्यक्षपदी गजानन देशमुख तर उपजिल्हाध्यक्ष पदी संदीप घूगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेंच जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली. जिल्हाउपाध्यक्ष गोविंद देशमुख (कळमनुरी),जिल्हा उपाध्यक्ष भिमराव बोखारे (वसमत ),उपाध्यक्ष गजानन मगर (सेनगाव ),जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण माळकर,जिल्हा सल्लागार महेंद्र पुरी,सहसल्लागार रमेश आढळकर,जिल्हा प्रसिध्दी प्रमूख शिवशंकर निरगुडे,सचिव बालाजी सरकटे,सहसचिव गोपाल सातपुते,जिल्हासंघटक नीळकंठ भांदलकर, जिल्हासहसंघटक विश्वनाथ देशमुख यांची निवड करण्यात आली.
महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी गंगासागर पंडित यांची निवड करण्यात आली तर प्रेसफोटो ग्राफर जिल्हाध्यक्ष पदी विजय गुंडेकर यांची निवड करण्यात आली. या वेळी शंकर भेराणे (सेनगाव,)पांडुरंग कऱ्हाळे (हिंगोली ), गंगाधर अडकिने (कळमनुरी ),प्रल्हाद चव्हान (वसमत )अहमद पठाण (औंढा नागनाथ ) या सर्वांची तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.मोहन कांबळे तालुका उपाध्यक्ष सेनगाव, तालुका सचिव गणेश सुतार सेनगाव यांची निवड करण्यात आली.यावेळी जिल्ह्यातील पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा