मालाविरुध्दचे व शरिराविरुध्दचे गुन्हे उघड
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी हिंगोली चंद्रकांत वैद्य
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील मालाविरुध्दचे व शरिराविरुध्दचे गुन्हे उघड करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करित असतात.
पो.स्टे नर्सी ना. हददीत जानेवारी २०२० मध्ये तळणी शिवारात वृध्द महिला नामे मथुराबाई पांडुरंग कोरडे वय ६५ वर्ष ही शेळीचे पिल्ले चारण्यासाठी भरदुपारी तळणी शिवारातील शेती मध्ये गेली असता अज्ञात आरोपीने मथुराबाई कोरडे हिचा गळा दाबुन खुन करून अंगावरील दाग दागिने काढुन घेतल्या बद्दल पो. स्टे नर्सी ना. येथे गुन्हा दाखल होता. अनेक परिश्रम करून सुध्दा सदरचा गुन्हा उघड होत नव्हता.
पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांनी सदर गुन्हा उघड करण्याबाबत पो.नि विकास पाटील स्थागुशा हिंगोली व सपोनि श्री अरुण नागरे पो.स्टे नर्सी ना. यांना सुचना दिल्या. गोपनिय सुत्राव्दारे माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा अशाच प्रकारचे गुन्हे करणारा रेकॉर्ड वरिल गुन्हेगार नामे नागोराव सुखदेव श्रीरामे वय २६ वर्ष रा. हानकदरी ता. सेनगाव यानी केला आहे अशा प्रकारच्या गोपनिय माहिती वरून पोलीस पथकाने संशयीत आरोपी नागोराव श्रीरामे यास ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचापुस केली असता सदर आरोपीनी गुन्हा केल्याचे कबुल करून गुन्हयातील मयत महिलेच्या अंगावरिल दाग दागीने चांदिचे दंडकडे व चांदिचे काकने एकुण ५६ तोळे वजनाचे अं ४८,०००/- रू चा मुददेमाल पोलीसांना काढून दिला असुन आरोपी हा पोलीस कष्टडी मध्ये आहे.
आरोपींनी सदरचा गुन्हा केल्या नंतर इतर ०३ महिलांच्या अंगावरिल सोन्या चांदीचे दाग दागीने जबरीने चोरल्या बाबत गुन्हे दाखल आहेत, सदर आरोपीवर जबरी चोरी, घरफोडी, फसवणुक असे एकुण ०७ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि श्री विकास पाटील स्थागुशा हिंगोली, सपोनि अरुण नागरे पो.स्टे नर्सी ना., सपोनि शिवसांब घेवारे स्थागुशा हिंगोली, पोउपनि होनाजी चिरमाडे, पोलीस अंमलदार गोविंद गुठठे, पांडुरंग डवले, हेमंत दराडे, राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा