रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण, प्रबोधन पर्व स्मरणिकेचे होणार विमोचन
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी हिंगोली चंद्रकांत वैद्य
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने हिंगोली येथील कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात 3 ते 5 जानेवारी दरम्यान सायंकाळी 7.30 वाजता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा व्याख्यानमालेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून यानिमित्ताने प्रबोधन पर्व या स्मरणिकेचे विमोचन करण्यात येणार आहे.
इ.स. 2000 पासून अखंडीतपणे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला सुरू आहे. 3 जानेवारी रोजी स्मृतीशेष ग्यानबाराव सिरसाट विचार मंचावर पहिले पुष्प होणार आहे. "एकवीसाव्या शतकातील महिलांचे अपेक्षित वर्तन " या विषयावर जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सिमाताई बोके मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील, उद्घाटक म्हणून उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा, प्रमुख अतिथी म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय संघटक सुनिता मुळे, प्रदेश उपाध्यक्ष ज्योती कोथळकर, प्रदेश संघटक डॉ. शितल कल्याणकर, प्रदेश सदस्या वंदना आखरे व वर्षा सरनाईक यांची उपस्थिती राहणार आहे.
दि.4 जानेवारी रोजी " मिथक म्हणजे काय ?" या विषयावर व्याख्याते डॉ. अशोक राना ( अमरावती ) विचार व्यक्त करणार आहेत. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उद्घाटक म्हणून जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण अधिकारी राजू एडके, उपविभागीय अभियंता सुदेश देशमुख, निरज देशमुख, बाबाराव श्रृंगारे यांची उपस्थिती राहणार आहे. तर दि. 5 जानेवारी रोजी "छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधान" या विषयावर व्याख्याते अॅड. गणेश हलकारे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर, उद्घाटक म्हणून पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे, डॉ. अनिल नायक, मारोतराव बुद्रूक पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. श्रोत्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा