आमदार यशवंत माने यांची माहिती
शिवशाही वृत्तसेवा, मोहोळ
राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांच्या विशेष सहकार्याने व मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडवणीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून व माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार यशवंत माने यांच्या पाठपुराव्यामुळे मोहोळ मतदारसंघातील अनेक वर्षापासून रखडलेला पंढरपूर टाकळी सिंकदर, कुरूल रस्ता ते राज्य मार्ग 202ला जोडणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 66 किमी 0/00 ते 33/900 रस्त्याला अखेर हिवाळी अधिवेशनात पाहिल्याच दिवशी रू 271कोटीचां निधी मंजूर झाला असुन त्यापैकी मोहोळ मतदारसंघासाठी रू 174कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आमदार यशवंत माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा