अवकाळी पावसामुळे कापसाची आवक रोडावली
![]() |
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
कै. डी. बी. पाटील होटाळकर यांच्या भारत कॉटन जिनिग प्रेसिंग नायगांव येथे मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी कापुस खरेदी केंद्रावर सकाळी 10 नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सीसीआयची कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी प्रमुख उपस्थितीती मध्ये आमदार राम पाटील रातोळीकर , नांदेड जिल्हा लोकसभा निवडणूक प्रमुख व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्हाध्यक्ष दिलीपराव पाटील धर्माधिकारी, माजी सभापती उमाकांत देशपांडे,
प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार, भाजपा नांदेड जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठाकरवाड, भाजपा जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे, माजी जिल्हा सरचिटणीस नांदेड श्रावण पाटील भिलवंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव लंगडापुरे, भगवान लंगडापुरे, माजी नगरसेवक प्रतिनिधी नायगाव चंद्रकांत पाटील चव्हाण यांची उपस्थिती होती.
नायगाव पंचक्रोशीतील शेतकरी बांधवानी आपला कापूस विक्री साठी स्व.डी.बी.पाटील यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या भारत कॉटन ऍग्रो बाजारच्या भारत जिनिंग नायगाव येथे आणला होता. असे चेअरमन शिवराज पाटील होटाळकर व दत्तात्रय पाटील होटाळकर यांनी सांगितले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा