maharashtra day, workers day, shivshahi news,

चेअरमन अभिजीत पाटील यांचा मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत वर झेंडा फडकला

मंगळवेढा तालुक्यात अभिजीत पाटलांची जोमाने गट व पक्ष बांधणी
Gram Panchayat Election , Chairman Abhijit Patil , mangalwedha , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (तालुका प्रतिनिधी राज सारवडे) 
मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीमध्ये पंचवार्षिक निवडणूक लागली असता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते अभिजीत आबा पाटील यांनी काही ठिकाणी स्वतंत्र पॅनल तर काही ठिकाणी समविचारीच्या माध्यमातून आपला पॅनल उभा करण्यात आलेला होता. यातूनच अभिजीत पाटलांना घवघवीत यश प्राप्त झालेले दिसून येत आहे.

यामध्ये काही ठिकाणी सरपंच तर काही ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य पदाची बाजी अभिजीत पाटील यांच्या गटाने मारलेली दिसून येत आहे.


एकीकडे राज्यामध्ये अजित पवार व शरद पवार यांच्यामध्ये फूट पडून देखील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे खंबीरपणे शरद पवार यांच्या पाठीमागे उभे राहून शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले असता अभिजीत पाटील हे मंगळवेढा तालुक्यात जोमाने व गावोगावी फिरवून आपला गट व पक्ष बांधणीमध्ये व्यस्त दिसत आहेत.  यामध्येच पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची चाचणी झाल्याचे बोलले जात आहे.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांनी निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीने ग्रामपंचायतीमध्ये सर्वांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहिलेले असून दिसून आले.

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी,  खडकी, देगाव, शिरशी, शेलेवाडी, डिसकळ, निबोंणी, मानेवाडी, रेड्डे, आंधळगाव, खूपसंगी, या ग्रामपंचायतीमध्ये आपले पॅनल निवडून आल्याबद्दल उमेदवारांचे अभिनंदनपर सत्कार श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आले.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !