रांजणगाव cctv कॅमेऱ्यांच्या नजरेत
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (तालुका प्रतिनिधी सुदाम दरेकर)
रांजणगाव या ठिकाणी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी अनेक विकास कामांचे लोकार्पण आणि 30 लाख रू. चे भूमीपूजन झाले यामध्ये हायप्रोफाईल चोऱ्या आणि गुन्हेगारी लक्षात घेता cctv कॅमेरे ही काळाची गरज होत चालली आहे.
हिच बाब ध्यानात घेत रांजणगाव चे सरपंच बंटी साबळे यांनी भाजपा तालुकाध्यक्ष राहुलदादा शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चक्क पुर्ण गाव आणि रस्ते cctv कॅमेर्यात आणले आहे. यामुळे चोऱ्या गुन्हेगारी यांना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.
खालील प्रमाणे कामे-
१) पुर्ण गावात CCTV कॅमेरे लोकार्पण सोहळा
२) स्ट्रीट लाईट लोकार्पण सोहळा 5लक्ष 25 पोल
३) भूमिगत गटार भूमी पूजन. 10 लक्ष
४)सरकरी दवाखाना शेड 3 लक्ष
५)स्मशान भूमी पाणी व्यवस्थापन 3.5लक्ष
६) धाडगेवडी शाळा दुरुस्ती 3लक्ष
७)शिंदे मळा शाळा स्वच्छ्ता गृह 2 लक्ष
८)महिलांसाठी बस स्थानक 1.5 लक्ष
९) धाडगेवाडी स्मशान भूमी दुरुस्ती 2.5 लक्ष
या कार्यक्रमासाठी भाजपा तालुकाध्यक्ष राहुलदादा शिंदे पाटिल, संजय मते मातोश्री बँक चेअरमन ,सरपंच बंटी साबळे,ऊपसरपंच बाबा जवक ,काका देशमुख,दत्ता लोणकर,शिवाजी शिंदे ग्रा.स ,स्वामी पवार ग्रा.स.गायकवाड भाऊसाहेब ,सतीश पवार तलाठी,महेश पवार,संदीप गायकवाड, आवी मांडगे अभिषेक देशमुख, चेअरमन लारा, रियाज मण्यार , काकासाहेब बोराटे आदी ग्रामस्थ हजर होते.
राहुलदादांच्या मार्गदर्शनाखाली गावात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. cctv कॅमेरे, शाळकरी मुलांना मोफत कराटे क्लास, पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी बंधारे, कचऱ्यासाठी घंटा गाडी, गावात सर्व नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, अद्यावत दवाखाना, गटार योजना, सर्वच धर्माच्या स्मशानभूमी, शाळेतील स्वच्छतागृह सोयीसुविधा, रस्ते यावर मोठ्या प्रमाणात काम जवळपास पुर्ण झाले आहे. असे सरपंच बंटी साबळे यांनी सांगितले
मी आदरणीय आण्णासाहेब हजारे आणि आदर्श गाव हिवरे बाजार चे सरपंच पोपटराव पवार यांच्या विचाराने प्रभावित आहे. आम्ही विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. त्यामुळे सर्वांनीच गुन्हेगारी, बेरोजगारी, पाणी आडवा पाणी जिरवा, शाळा, आरोग्य, युवकांना चांगला रस्ता दाखवुन मार्गदर्शन करणे गरजेच आहे.राहुल शिंदे पाटिल
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा