कहाळा ते नायगाव रस्त्यावरील कल्याण टोल नाक्यावरची परिस्थिती
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे काहाळा ते नायगाव रस्त्यावरील टोल नाका बांधून रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता चांगला प्रकारे करण्यासाठी टोल वसुली जोरात सुरू आहे . मात्र रस्ते खराब झालेले स्पष्ट दिसत असून टोल घेणे काही बंद होत नाही त्याचबरोबर रस्ते बनवले जात नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक विभाग नांदेड यांच्या मार्फत रस्त्याची दुरावस्था होत असतानाही पाहिले जात नाही.
मात्र नागरिकाकडून रस्त्याच्या टोल वसुली जोरात होत आहे .हे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काहाळा ते नायगाव नांदेड हैदराबाद महामार्गावर या टोल नाका बांधण्यात आला सदर टोलनाका 2003 मध्ये सुरुवात करण्यात आले असून तेव्हापासून आजपर्यंत करोडो रुपये वसुली करण्यात आली मात्र नांदेड ते नरसी महामार्गावर जाण्यासाठी रस्ता आजपर्यंत हे खड्ड्याचा झाला असून महामार्गावर मात्र खड्डे पडून डांबर उडून गेले तरीही या रस्त्याची टोल वसुली जोरात होत असून लोकप्रतिनिधी सहित वरिष्ठ अधिकारी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड यांचेही वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. सदर टोलनाका हे केटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत चालवला जात असून करोडो रुपयांची वसुली केली जात आहे.
मात्र रस्ता महामार्गावर खड्डे पडले असून त्याचे मोठे अपघातही होत आहे मात्र याकडे कोणीही पाहिल्या जात नाही सदर टोल नाका हा जोरात सुरू असून लाखो ते हजार करोडो वाहने या रस्त्यावरून येजा करत असतात त्याचे आणि करोडो रुपये वसुली होत आहे. याचा पत्ताही लागत नसून नागरिकांना जाण्यासाठी चांगले रस्ते तरी बनवण्यात यावी अशी मागणीही परिसरातील वाहनधारकांकडून सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
टोलनाकाची वसुली व टोलनाच्या केव्हा सुरुवात करून त्याचे मुद्दत केव्हा संपले याची सर्व माहिती ही नागरिकांना देण्यात यावी अशी मागणी एका नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता देगलूर यांच्याकडे केली आहे . त्यामुळे सदर माहिती मिळेलच परंतु सध्या टोल वसुली जोरात असून रस्ते खराब झाले आहेत हे स्पष्ट दिसत असून रस्त्यावर डांबरीकरण करून नागरिकांना चालण्यासारखे रस्ते तरी बनवण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा