maharashtra day, workers day, shivshahi news,

बाराशे रुपयांची लाच घेताना तहसीलचा कंत्राटी कर्मचारी चतुर्भुज

सापळा लावून एसीबी ची यशस्वी  कार्यवाही
Tehsil contract employee Chaturbhuj taking bribe , naigaon , nanded , shivshavi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव पंचायत समिती अंतर्गत चालणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामा वर गेल्या अनेक दिवसांपासून काम करणाऱ्या  शिवराज दत्तराम नकाते, वय 36 वर्षे, लिपिक तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर (कंत्राटी), तहसील कार्यालय, नायगाव (खै.), अतिरिक्त कार्यभार पंचायत समिती, नायगाव (खै.), ता. नायगाव, जि. नांदेड.रा. बेटक बिलोली, ता.नायगाव, जि. नांदेड. याने लाच घेतल्या प्रकरणी तहसील नायगाव येथे चतुर्भुज झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे.

   या बाबद सविस्तर वृत्त असे की,यातील तक्रारदार वय 50 वर्ष यांची मौ. आंतरगाव, ता. नायगाव येथे शेत गट क्र. 592 मध्ये वडिलोपार्जित 34 गुंठे शेत जमीन आहे. त्या शेत जमिनीवर सन 2021-2022 मध्ये पंचायत समिती, नायगाव यांचे कडून फळबाग लागवडी साठी रोजगार हमी योजने अंतर्गत एकूण 1,50,000/- रुपयांचे शासकीय अनुदान मंजूर झाले आहे. नमूद शेत जमिनीत  तक्रारदार यांनी 250 पेरूंच्या झाडाची लागवड केली आहे. 
    या फळबाग लागवडीसाठी तक्रारदार यांनी विविध शेतमजुराकडून कामे करून घेतली. झालेल्या कामाचे एकूण 3 टप्प्यात प्रत्येकी 45,000/- रुपये प्रमाणे 1,35,000/- रुपये शासकीय अनुदानाची रक्कम तक्रारदार यांना मिळाली आहे. चौथ्या टप्प्यातील झालेल्या कामाचे ई-मस्टर मागणी अर्ज, तक्रारदार यांनी पंचायत समिती, नायगाव येथे केला होता. 

     परंतु तक्रारदार यांचे शेतात शेतमजुरांनी केलेल्या कामाचे शासकीय अनुदानाचे बिल मिळत नसल्याने तक्रारदार हे पंचायत समिती, नायगाव येथे गेले. त्यावेळी झालेल्या कामाचे बिल ऑनलाईन झाले नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तक्रारदार यांनी  रोजगार हमी योजनेचे ऑनलाईन ई-मस्टर बिले सादर करणारे डाटा एन्ट्री ऑपरेटर नकाते यांची भेट घेतली. 
    त्यावेळी नकाते यांनी 1500/- रुपये लाचेची मागणी केली. सदरचे 1500/- रुपये हे लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने त्यांना ती द्यावायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे याबाबत 18  अक्टोंबर रोजी तक्रार दिली. 
        त्यावरून लाचलुचपत  प्रतिबंधक विभाग, नांदेड येथील सापळा पथकाने दि. 19/10/2023 रोजी लाच मागणी पडताळणी केली. पडताळणीच्या दरम्यान यातील डाटा एन्ट्री ऑपरेटर (कंत्राटी) इलोसे शिवराज दत्तराम नकाते यांनी तक्रारदार यांना शासकीय पंचासमक्ष ऑनलाईन ई-मस्टर बिले सादर करण्यासाठी 1500/- रुपयाचीमागणी केली. तडजोडीअंती 1200/- रुपये लाच स्विकारण्याची संमती दिली.

      नकाते यांनी शासकीय पंचासमक्ष 1200/-   रुपयाची लाच स्विकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड चे पथकाने रंगेहात पकडले.  शिवराज दत्तराम नकाते,  यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन नायगाव, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
 डॉ.राजकुमार शिंदेपोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड.पर्यवेक्षण अधिकारी राजेंद्र पाटील,पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, नांदेड.यांच्या मार्गदर्शना खाली ही कार्यवाही करण्यात आली असूनसापळा तपास अधिकारी संदीप थडवे, पोलीस निरीक्षकअँटी करप्शन ब्युरो, नांदेड. यांनी केली असून सापळा कारवाई पथक सपो उप नि. गजेंद्र मांजरमकर, पो शि/यशवंत दाबनवाड, पोशि/ईश्वर जाधव, चापोह मारोती सोनटक्के, अँटी करप्शन ब्युरो, युनिट नांदेड यांनी ही यशस्वी कार्यवाही केली आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !