उद्या होणार अंत्यसंस्कार
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावचे सुपुत्र अक्षय लक्ष्मण गवते (२०) यांना सियाचीन मधील ग्लेशियर या ठिकाणी वीरमरण आले त्यांना सैन्यात भरती होऊन फक्त ९ महिनेच झाले होते 20 ऑक्टोंबर च्या रात्री साडअकराच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने कर्तव्यावर असताना त्यांचे निधन झाले उद्या दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी सोमवारी सकाळी त्यांच्या बुलढाणा तालुक्यातील मूळगावी पिंपळगाव सराई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात आई वडील एक लहान बहीण असा परिवार आहे त्यांच्या निधनाची बातमी समजताच जिल्ह्यात एक दुःखाची लाट निर्माण झाली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा