दैनिक लोकपत्र चे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांना अटक
शिवशाही वृत्तसेवा, शिवाजी कुंटूरकर , नांदेड जिल्ह्य प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर येथील दैनिक लोकपत्र चे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांना अटक करून लोकशाहीची मुस्कटदाबी केलेल्या घटनेच्या निषेधार्थ व्हाईस ऑफ मीडिया नायगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले,
रवींद्र तहकीक यांनी शासनाच्या विरोधात सडेतोड भूमिका घेऊन लेखन केल्याबद्दल त्यांना जाणीवपूर्वक अटक करून लोकशाही स्वातंत्र्याची गळचे पी करत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे .त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्र प्रतिनिधी यांना स्पष्ट आणि निर्भीडपणे लिखाण करणाऱ्या वर काही मर्यादा येत आहेत त्यांच्यावर प्रतिबंध लावण्याच्या उद्देशाने अटक करण्यात आले आहे .
यापूर्वी देखील लोकशाही वृत्तवाहिनी काही तासासाठी बंद करण्यात आली होती अशा वारंवार होणाऱ्या घटनांमुळे लोकशाहीवर घाला घातला जात आहे.
या घटनेचा व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार नायगाव संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून याबाबत व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने निषेधाचे लेखी निवेदन दि.२०|१०|२०२३ रोजी नायब तहसीलदार देवराये यांना देण्यात आले.
यावेळी बाळासाहेब पांडे,नागेश पाटील कल्याण,बालाजी नागठाणे, माधव मामा कोकुरले,नागोराव पा.बंडे संदिप कांबळे,प्रदीप झुंजारे,पवनकुमार पुटेवाड,शिवाजी कुंटूरकर,यांची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा