बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ विविध मान्यवर घ्या उपस्थित संपन्न झाला.
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी जगदीश कोरीमठ सोलापूर
अनगर (ता.मोहोळ)येथे लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचा 20वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ जिल्हाधिकारी सोलापूर मा. कुमार आशीर्वाद यांच्या शुभहस्ते व माजी आमदार मा राजनजी(मालक)पाटील व आमदार मा यशवंत(तात्या)माने,कारखान्याचे चेअरमन मा बाळराजे राजनजी पाटील,सिनेट सदस्य मा अजिंक्यराणा राजनजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी तहसीलदार सचिन मुळीक, मोहोळ नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.योगेश डोके, गटविकास अधिकारी आनंद मिरागणे यांच्यासह सर्व संचालक मंडळ, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा दुध संघाचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, सोसायटीचे सर्व चेअरमन, पदाधिकारी कार्यकर्ते,अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा