maharashtra day, workers day, shivshahi news,

उर्वरित गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभिजीत पाटील यांना विधानसभेमध्ये पाठवा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

कष्टकरी शेतकऱ्यांची जाण असलेले नेतृत्व म्हणजेच अभिजीत पाटील
Abhijit Patil , NCP state president Jayant Patil , pandharpur , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर असताना टेंभू म्हैसाळ योजनेसाठी उर्वरित पाणी वितरणाबाबत हुन्नूर येथे पाणी परिसंवाद व शेतकरी मेळाव्याचे अयोजन राष्ट्रवादीचे नेते,श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

येथील ३५ गावांचा ज्वलंत प्रश्न तत्कालीन स्व. आमदार भारत भालके नाना नेहमीच मांडायचे.  या योजनेसाठी पाणी साठा परवाना कमी असल्याने महाविकास आघाडी सरकार काळात अतिरिक्त 1 टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले. तसेच जत कालवा मंगळवेढा वितरीका १ व अन्य वितरिकांच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील  ६००० हेक्टर क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे हि तत्कालीन मा. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत असताना मागील २.५ वर्षाच्या काळात या योजनेला गती देण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी सरकारने मागील १ वर्षाच्या काळात कोणतेही ठोस काम या योजनेसाठी केले नसल्याचे प्रामुख्याने दिसून येते. 

सध्या राज्यातील पावसाची परिस्तिथी पाहता या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून देखील सरकारला जाग येत नाही. इथला शेतकरी हवालदिल झालेला असताना देखील सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. सध्याचे सरकार पालकमंत्री पद वाटपामध्येच अडकुन पडले असल्याचे राष्ट्रवादीचे नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले. 



यावेळी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, निरिक्षक शेखर माने,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राहुल शहा, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष मुझमिल काझी, नगरसेवक विजयकुमार खवतोडे, माऊली कोंडूभैरी, जमीर इनामदार, माणिक गुंगे, अमित मम्हाणे, अण्णा शिरसाट, अशोक रणदिवे, प्रदीप खरतोडे, नागेश फाटे, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, गणेश पाटील तसेच पंचक्रोशीतील अनेक शेतकरी मंडळी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !