विविध विषयावर व्याख्यान आणि विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे पंढरपूर येथे जिल्ह्याचे लोकप्रिय माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस विविध वैचारिक व शैक्षणिक उपक्रमानी साजरा करण्यात आला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी. पाटील यांनी दिली.
यामध्ये दि ५ सप्टेंबर २०२३ रोजी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी व शिक्षकांसाठी “आर्थिक साक्षरता” या विषयावर तज्ञांकडून विशेष मार्गदर्शन देण्यात आले. यामध्ये आपण आपल्या कमवलेल्या पैशाचा वापर कुठे, कसा व किती करावा, तसेच मिळालेले पैसे कुठे खर्च करायचे, कुठे गुंतवायचे अणि कुठे खर्च नाही करायचे याविषयीचे सखोल मार्गदर्शन प्राध्यापक व विद्यार्थ्यांना देण्यात आले.
दि ६ सप्टेंबर २०२३ रोजी विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध व्याख्याते प्रा.आर.डी. पवार यांच्या व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्यांची कर्तव्ये, व्यवहारी शिक्षण, अभियंता झाल्यावर समाजप्रती हवा असणारा सेवाभाव अश्या अनेक मुद्द्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून उपप्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर यांनी काम पाहिले.
त्याचप्रमाणे दि ६ सप्टेंबर २०२३ रोजी महाविद्यालयाच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागामार्फत विविध विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विध्यर्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे विजेते गायत्री बळवंतराव, साक्षी भिंगे, सुहानी यादव व रियाज नदाफ या विधार्थ्यांना व्याख्याते प्रा. आर डी पवार यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रा. रणजित भोसले यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले.
यावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यासर्व कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. सुशील कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर प्रा. धनंजय शीवपुजे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा