जिजाऊ स्मारक बांधकामास लवकरच सुरुवात होणार
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर येथील माँसाहेब जिजाऊ स्मारक जिजाऊ सृष्टी उभारणे हा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता याविषयी आमदार समाधान आवताडे यांनी जिजाऊ स्मारक आणि जिजाऊ सृष्टी उभारणी करणे साठी एक कोटी निधी मंजूर करून दिला आहे या संदर्भात स्मारक कसे असावे याबाबत आमदार आवताडे यांनी प्रांत अधिकारी गजानन गुरव,तहसीलदार सुशील बेल्हेकर,नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद माळी,मराठा संघटनेचे पदाधिकारी व बहुजन समाज बांधव यांच्या समवेत विचार विनिमय बैठक घेतली.
पंढरपूर ही आध्यात्मिक नगरी असून विठुरायाचे दर्शन घेण्याकरिता महाराष्ट्रातून व इतर राज्यातून अनेक भाविक दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी गजानन महाराज,मठ कैकाडी महाराज मठ व तुळशी वृंदावन या ठिकाणी येणारा भाविक विरंगुळा करणे करिता जात असतो जर माँसाहेब जिजाऊ सृष्टी उभारली गेली तर येणाऱ्या भाविकांना माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्र व विचार पुढील पिढीस नक्कीच मिळणार आहेत या गोष्टीचा विचार करून हेच स्मारक भव्य दिव्य करण्याचा संकल्प आमदार आवताडे यांनी घेतला असून हे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यास दिले आहेत.
यावेळी आमदार आवताडे यांनी उपस्थितांची मते विचारात घेतली असून या स्मारकामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट करण्यात याव्यात हे स्मारक कसे असावे याविषयी विचार विनिमय केले आमदार आवताडे बोलताना असे म्हणाले की या स्मारकास एक कोटी निधी दिला असून पुढील जो निधी लागेल तो मी कमी पडू देणार नाही व त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे सुशोभीकरण व पंढरपूर शहरातील असलेल्या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्यास मी तत्पर आहे असे आमदार आवताडे म्हणाले तसेच पुढील काळात माँसाहेब जिजाऊचे स्मारक तयार झाल्यास या अध्यात्मिक नगरीचे वैभव आणखी जोमाने खुलणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा