विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
धर्माबाद - गुरुकुल विद्यालय येथे विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी आर ओ वाॅटर फिल्टरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. याचे उद्घाटन आज विद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून लालबहादूर शास्री महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ कनसे एन एस हे उपस्थित होते.याप्रसंगीसंचालक नरसिंह रेड्डी, कमलाकर एन जी , उस्केलवार ए एम , डाॅ. श्रीगीरे बालाजी ,पत्रकार सुधाकर जाधव, लक्ष्मण तुरेराव हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनमोहन कदम यांनी केले सहशिक्षिका अपर्णा कुरेपाटिल यांनी पाण्याचे महत्व संस्कृत भाषेतून सांगितले.
एम पी एस सी मार्फत 2020 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक निवड यादीत गुरुकुल विद्यालयाची माजी विद्यार्थिनी सुप्रिया साईनाथ कोल्हेवाड हिने एसटी प्रवर्गातून महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवला. तिचा आज मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डाॅ कनसे यांनी सांगितले की ,' मोबाईलचा नाद करू नका स्पर्धेच्या युगात अभ्यास तुम्हाला नक्कीच ' असे सांगितले तर सुधाकर जाधव यांनी 'विद्यार्थ्यानो माणूस बना' कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक गोपतवाड पी एल यांनी 'पाण्याचे महत्व ओळखा, पाण्याचे संवर्धन करा' असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक बनसोडे एल एन यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका बाबळे ए आर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा