सिंचन विहीर अधिग्रहणाचे ५४ लाभार्थ्यांचे बिल रखडले
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील गडगा येथील रामदास भाकरे सिंचन विहीरी गडगा ग्रा.पं.ने अधिग्रहण केली होते,मात्र १५ महिन्यापासून तालुक्यातील एकाही लाभार्थ्यांना अद्यापही अधिग्रहण केलेल्याचा मोबदला रुपये ३०२८४०० एवढी रक्कम मिळाली नाही.
त्या संदर्भात तहसिलदार नायगाव यांना निवेदन कर्त्याने वारंवार भेटून अधिग्रहण केल्याचे पैसे मिळाले नसल्याने त्यांच्याशी तोंडी चर्चा केली,मात्र कांहीही उपयोग झाला नसल्यामुळे अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. परंतु तत्कालीन तहसिलदार गजानन शिंदे यांच्या चुकीच्या धोरणामुळे अद्यापपर्यंत माझ्यासह नायगाव तालुक्यातील ५४ अधिग्रहण लाभार्थ्यांना मोबदला (पैसे) मिळाले नाहीत, त्यामुळे नायगाव तहसील प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दिनांक २६ जुलै २०२३ पासून आमरण उपोषणात बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गडगा ग्रामपंचायत ने सिंचन विहीरी अधिग्रहण केलेल्या 54 प्रस्तावास तत्कालीन तहसिलदार गजानन शिंदे नायगाव व उपविभागीय अधिकारी बिलोली यांनी अद्यापपर्यंत मान्यता दिली नाही. त्या अधिग्रहण प्रस्तावास तात्काळ मान्यता देऊन ५४ लाभाध्याचे ३० २८४०० रुपये एवढी रक्कम खात्यामध्ये वर्ग करण्याची विनंतीही निवेदनात केली आहे.
निवेदनावर उपोषधकर्ता रामदास दिगांबर भाकरे यांनी सही केली असून सदर निवेदनाच्या प्रतिलिपी मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई.पाणीपुरवठा मंत्री मुंबई, पोलीस अधिक्षक नांदेड याना दिल्याचे उपोषण कर्त्याने सांगितले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा