शेतकऱ्यांचा पोटखराब्याचा प्रश्न मार्गी लावल्याने शेतकरी समाधानी
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (प्रतिनिधी विष्णू मुंगसे)
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील 269 पैकी 188 शेतकऱ्यांचा पोटखराब्याचा प्रश्न मार्गी लावल्याने भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा बालाजी देडगाव येथे नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी देडगाव ग्रामपंचायत सदस्य उद्धव मुंगसे व देडगाव विविध सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन कारभारी भाऊ मुंगसे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
भारतीय जनता पार्टीचे तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आकाश चेडे, पोलीस मित्र समितीचे अध्यक्ष शहादेव मुंगसे, तसेच पोपट बनसोडे यांनी देडगाव मधील सर्व शेतकऱ्यांचा पोट खराबा निघण्यासाठी जिल्हा अधिकारी तसेच प्रांत अधिकारी, नगर, नेवासा तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. तरीही हा प्रश्न मार्गी लागत नव्हता.
त्यामुळे 1ऑगस्ट पासून कार्यकर्ते जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्यासमोर उपोषणास बसणार होते. जिल्हा अधिकारी व प्रांत साहेब यांनी कार्यकर्त्यांनी उपोषणास बसू नये म्हणून नेवासा तहसीलदार यांना 188 शेतकऱ्यांची पोट खराबा यादी जाहीर केली आहे.
त्यामुळे188 शेतकऱ्यांचा पोटखराब्याचा प्रश्न मार्गी लागला. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे हे 188 पोट खराब्याचे प्रकरणी मार्गी लागली आहे असे माजी आमदार मुरकुटे म्हणाले.
त्यावेळी देडगाव विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन महेश कदम माजी चेअरमन बुधाजी गोयकर, माजी चेअरमन गोकुळ वांढेकर, रामकिसन तांबे, युवा नेते निलेश भाऊ कोकरे, अरुण वाडेकर , हरिभाऊ मुंगसे, राजू कदम, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा