छ.संभाजीनगर मधील खाजगी दवाखान्यात घेतला अखेरचा श्वास
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे धाकटे बंधू मेहकरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांचे दिनांक २५ ऑगस्ट रोजी निधन झाले. संजय जाधव हे मागील काही दिवसांपासून लिव्हरच्या आजाराने त्रस्त होते. छत्रपती संभाजी नगर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज अखेर दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर मेहकर येथील जानेफळ रोडवरील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा