पारनेर तालुक्यातील पळवे परिसरातील शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा
शिवशाही वृत्तसेवा, प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर
पावसाअभावी मुगाची पिके जळू लागली असून संपूर्ण शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे अशी माहिती पळवे खुर्दचे मा.सरपंच मा.श्री.नानाभाऊ गाडीलकर यांनी दिली ते म्हणाले आज शेतीवर आधारित असलेला बळीराजा पावसासाठी भुकेलेला असून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे संपूर्ण पिके आज सुकून चालली आहेत.
पूर्ण शेतकरी वर्ग हा आपल्या काळ्या आईची सेवा करत असताना शेतीबरोबर जोड धंदा म्हणून गाई दूध धंदा पण मोठ्या प्रमाणावर परिसरात असून जनावरांसाठी चारा पण राहिलेला नाही अक्षरशः विकत चारा घेण्याची वेळ दूध उत्पादकावर आलेली आहे म्हणून मुक्या जनावरांसाठी पण चाऱ्याचा प्रश्न भेडसावत चालला आहे मुगाबरोबर,वाटाणा,बाजरी, मका,घास,सोयाबीन,तुर,अस्या अनेक प्रकारची पिके मोठ्या प्रमाणावर आहेत म्हणून शेतकरी वर्गासाठी पावसाची खूप मोठी अपेक्षा लागली आहे पाऊस जर झाला नाही तर गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील अवलंबून असणार आहे
------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा