maharashtra day, workers day, shivshahi news,

केदारवडगाव येथील आत्महत्याग्रस्त पंचायत समितीचे माजी सभापती सय्यद रहीम यांनी शिलाई मशीन दिल

उदरनिर्वाहासाठी मयताच्या पत्नीला शिलाई मशीन दिली आहे

Helped wife of deceased by providing sewing machine , naigaon , nanded , shivshahi news.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर

नायगाव : तालुक्यातील केदारवडगाव येथील जयसिंग परशुराम जाधव (४५) या शेतकऱ्यांने नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आठ दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्याग्रस्त कुटूबांची पंचायत समितीचे माजी सभापती सय्यद रहीम यांनी शनिवारी भेट घेवून उदरनिर्वाहासाठी मयताच्या पत्नीला शिलाई मशीन दिली आहे. 


 सततची नापिकी, कर्जामुळे तणावाखाली आलेल्या केदारवडगाव येथील जयसिंग परशुराम जाधव (४५) शेतकऱ्याने चुलत भावाच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना (ता.२४) जूलै रोजी दुपारी उघडकीस आली. मयत अल्पभूधारक शेतकऱ्यास केदारवडगाव शिवारात पाच एकर शेती असून. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या गडगा शाखेत त्यांच्या नावावर ६१ हजार १४ रुपये पीककर्ज आहे. सततच्या नापिकीमुळे कुटुंबात वाढलेल्या कर्जाने ते फेडण्याच्या तणावाखाली होते. त्यातच यंदा उशिरा झालेल्या पेरणीमुळे अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही, या चिंतेत  त्यांनी २४ जूलै रोजी दुपारी त्यांनी चुलत भाऊ जळबा एकनाथ जाधव यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून जिवन संपविले. 

    घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले होते. हि बा नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती सय्यद रहीम यांना समजल्यावर त्यांनी नाम फाऊंडेशनचे भाऊराव मोरे यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. मोरे यांनी मयताच्या घरच्या परिस्थितीचा विचार करुन मयताच्या पत्नीला शिलाई मशीन देण्यात यावी असे सुचवले. सय्यद रही यांनी शनिवारी मयत कुटुंबाची भेट घेवून शिलाई मशीन दिली. यावेळी मयताची पत्नी तिर्थाबाई जयसिंग जाधव, मुलगा बळवंत जाधव, भाऊराव मोरे, पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार लक्षण बरगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !