कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विवधि कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी)
दिनांक १८ ऑगस्ट रोजी आपटे उपलप प्रशालेत स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यतीथी निमित्त पंढरपूर अर्बन बॅकेच्या संचालकांच्या वतीने प्रशालेत स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मा अर्जुनराव भोसले व चेअरमन सतिश मुळे यांचे शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले
यावेळी विद्यार्थ्यांना श्री भोसले साहेब, चेअरमन सतिश मुळे, व्हा चेअरमन सौ माधूरीताई जोशी बॅकेचे जनरल मॅनेजर उमेशराव विरधेआपटे उपलप संस्थेचे सचिव बी जे डांगे व सर्व संचालकांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या .
पोलीस अधिकारी श्री भोसले यांनी स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्याचा गौरव केला व बँकेच्या संचालक मंडळाने स्वखर्चातून विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या वह्या वाटपाचे कार्यक्रम घेतल्या बदद्ल आभार व्यक्त केले विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाबरोबर संस्कार व खेळ, यामध्येसुद्धा विशेष लक्ष देवून आपली शैक्षणिक वाटचाल पूर्ण करावी असे आवहान केले, कार्यक्रमात चेअरमन सतिश मुळे व जनरल मॅनेजर उमेश विरधे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमास संचालक हरिष ताठे, मनोज सुरवसे, विनायक हरिदास, राजू कौलवार, गजेंद्र माने, गणेश सिंघण, पांडुरंग घंटी, डॉ संगीता पाटील,अनंत कटप,सोमनाथ होरणे, लाड बँकेचे सहायक मॅनेजर राजेंद्र आगावणे, प्रशालेचे मुख्याध्यापक जयंत हरिदास, प्रशालेचे शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे संचालक अनिल अभंगराव यांनी केले व आभार पर्यवेक्षक दत्तात्रेय धारुरकर यांनी मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा