maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारात असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळी चांगली रणधुमाळी सुरू

काळे गटाला मोठा धक्का विद्यमान संचालक अभिजीत पाटील यांच्या गटात

sahakar shiromani sugar factory , Abhijit Patil , pandharpur , shivshahi news.
सहकार शिरोमणीचे संचालक बाळासाहेब कौलगे आणि संचालक बिभीषण पवार व माजी जेष्ठ संचालक मधुकर गिड्डे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे प्रवेश
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारात असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळी चांगली रणधुमाळी सुरू असताना अभिजीत पाटील यांच्याकडे दिग्गज नेत्यांचे वाढते वजन पारड्यात पडल्याने अभिजीत पाटलांचे राजकीय वजनात अजून भर पडली आहे..
दि .30 मे रोजी सायं७वा उपरी येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह. सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक बाळासाहेब कौलगे आणि संचालक बिभीषण पवार त्यांच्यासह सुपली येथील डी.वाय ॲग्रोचे बाळासाहेब यलमार, माजी संचालक, पोलीस पाटील बाळासाहेब पाटील, सहकार शिरोमणीचे मा.संचालक मधून गिड्डे, मा. बाळासाहेब बापू शेवाळे, शेळवे आर डी पवार सर, पळशी बजरंग जाधव, गोपाळ तात्या झांबरे, कल्याण काळे यांचे कट्टर समर्थक संजय मधुकर गाजरे सर, देवानंद जगदाळे आनंदा जगदाळे, श्रीमंत जाधव, जगन्नाथ लंगोटे, माणिक रामचंद्र गाजरे महाराज यांच्यासह आढीव येथील तंटामुक्ती अध्यक्ष नितीन चव्हाण यांनी अभिजीत पाटील गटामध्ये जाहीर प्रवेश केला.
उपरी, सुपली, पळशी, शेळवे या गावातील असंख्य प्रतिष्ठित व्यक्तींनी सहकार वाचविण्यासाठी, त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, आपल्या सोबत काम करण्याची भूमिका घेत आपल्या पॅनलमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. सत्ताधारी ऊस बिल, कर्मचाऱ्यांचे देणे, पुढील हंगामात पैसे उपलब्ध कसे करणार या साध्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतील का? असा प्रश्न यावेळी अभिजीत पाटील यांनी उपस्थित केला..
यावेळी विठ्ठलचे संचालक साहेबराव नागणे, दत्तनगर नागणे, पेटकर आप्पा नागणे, माणिक नागणे, अशोक जगदाळे, सदाशिव मुळे, ज्ञानेश्वर तात्या नागणे, भगवान नागणे, शहाजी जगदाळे, जयवंत नागणे, भीमराव गव्हाणे, पोपट आसबे, नवनाथ आसबे, बबन मोहिते, चंद्रकांत जाधव, कल्याण नागणे, गोरख नागणे, केशव सुरवसे तसेच प्रवीण नागणे सर भारत नागणे बजरंग नागणे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.


----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !