नायगाव पं.स. कनिष्ठ अधिकारी बासरकर सेवानिवृत्त
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव पंचायत समितीमध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून या पदावर 2017 पासून कार्यरत असलेले सुभाष व्यंकटदास बासरकर यांची आज शासनाच्या नियमाप्रमाणे सेवानिवृत्ती झाल्यामुळे पंचायत समिती येथे सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न झाला आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाजे तर उद्घाटक म्हणून तहसीलदार गजानन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष टि. जी पाटील रातोळीकर, ग्रामसेवक नारसन वाटड व पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये सुभाष व्यंकटदास बासरकर कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांची सेवापुर्ती गौरव सोहळा आयोजित केला होता.
यामध्ये पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने त्यांना सह पत्नीक यथोचित सत्कार करून त्यांच्या एकंदरीत समाधान कारक कार्यप्रणालीचा आढावा सांगण्यात आला आहे. सुभाष बासरकर हे प्रेमाळू आणि आपल्या कामात कुठलाही कसूर न करता 2017 पासून नायगाव पंचायत समिती येथे कार्यरत असताना त्यांनी आपल्या कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर लोकांची चांगली कामे केली.
आहेत म्हणून त्यांच्याबद्दल समाधानकारक सर्व स्तरातून उत्तर मिळत असताना आज त्यांच्या या सेवानिवृत्त कार्यक्रमानिमित्त सेवापुर्ती गौरव सोहळा आयोजित करून अनेकांकडून त्यांचा सत्कार करण्यात आलेल्या वेळी विस्तार अधिकारी महेश मुखेडकर नवाज शेख अधीक्षक, कक्ष अधिकारी आमोद टोम्पे, मदन ठाकूर, बालाजी अष्टुरे ,अडकिने पाटील वाहन चालक, अर्जुन वजीरे व पाटील साहेब या अधिकार्यासह श्री बारसकर यांचे बंधू उत्तम वेंकटदास बासरकर छोटे बंधू अनंत व्यंकटदास बासरकर जावई विलास सुधाकर देशपांडे रामभाऊ मारुतीराव जकाते किशन सुरेश कुलकर्णी व संपूर्ण कुटुंबीयांची प्रमुख उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा