कुंभार समाजाचा वधूवर परिचय मेळावा
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
समाज हा तसा अल्पसंख्याक समाज असून महाराष्ट्रातील बर्याच गावांमध्ये एकही घर शोधून सापडत नाही.तर तुरळकच गावांमध्ये एखादे घर असते.यामुळे समाजातील विविध विषयावरील अडीअडचणी समजून घेणे विचारांची देवाणघेवाण करणे, अवघड असते. वधूवर परिचय मेळावा,गुणवत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाजातील यशस्वी व्यक्तींचा सत्कार होण्यासाठी व विखुरलेला समाज एकत्रित येऊन एकमेकांच्या विचारांच्या देवाण घेवाणीसाठी कुंभ दीपस्तंभ समाजोन्नती संस्था,नांदेड (महाराष्ट्र प्रदेश) च्या वतीने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू असुन समाजातील विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी समाज बांधव यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधवांच्या सहकार्याने अमरावती येथे दि.10 जून,2023 रोजी परदेशी कुंभार समाजाचा मेळावा आयोजित केलेला आहे.
तरी महाराष्ट्रातील कुंभार समाज बांधवांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन सुभाष तेटवार संस्था अध्यक्ष,हरिश्चंद्र चिल्लोरे सचिव, गजानन बनचरे महासचिव प्रा. अँड विजय गुजरे उपाध्यक्ष,प्रा.नरसिंग पिंपरणे उपाध्यक्ष,विष्णुपंत परडे कोषाध्यक्ष व बालाप्रसाद परडे कार्याध्यक्ष यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा